उद्या आपण गुढी उभारू
म्हणताच
पोराने आ वासला
गुडी क्काय ???
बाप समजला
पोराला अर्थ नाही कळला
‘गुढी पाडवा’ म्हणजे…
काठीला कलश,
त्याला जरतारी फडकं
नवं वर्ष वगैरे सांगू लागला
पोराचा आ आणखी वासला
मग आपण ३१ डिसेंबरला
कां उचंबळलो विचारताच
‘ते इंग्रजी रे, हे आपलं’
म्हणत बाप खजील झाला
गुढी पाडवा अंगाशी आला…  
Advertisements