गाढवांच्या फौजा मेंटल झाल्या 
तापत्या रस्त्यावर तंगड्या उधळल्या
गुटख्याच्या श्वासात डीजेचा माज
उत्सवाचा दिवस आहे आज
 
दोन पेग आत्ता, चार नंतर
स्लो मोशन झिंगेचं वाढलं अंतर
सैराट धबडगा गल्लोगल्ली
उत्सवाची मस्ती खरी
चेहेऱ्यावरती विचकट भाव
उत्सवाचा दिवस आहे आज
आधी ओळखीचे आता परके
सगळे जग उलटे फिरते
याड लागलय म्याड वाटतय
आर्ची-परशा धुंद नाचवतंय
गुलाली रंग चढलाय खास
उत्सवाचा दिवस आहे आज
Advertisements