खडतर यशाचे धनी – सोनिक-ओमी

अतिशय कर्णमधुर संगीत. एकाहून एक हिट गाणी. तरीही त्या काळातील मोठे बॅनर त्यांना संगीत दिग्दर्शन देण्यास तयार नव्हते, त्यामुळे जे सिनेमे मिळतील ते घेण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. तरीही आपल्या कामावरील निष्ठा तसूभरदेखील कमी होऊ न देता हिट गाणी देण्याचा वसा कायम ठेवणारे कमनशिबी संगीतकार म्हणजे मास्टर सोनिक आणि ओमप्रकाश शर्मा; अर्थात सोनिक-ओमी.

वर्ष होतं १९४९. एकवीस वर्षाचा अंध युवक मास्टर सोनिक, आपल्या दहा वर्षाच्या पुतण्याचा, ओमप्रकाश शर्माचा हात धरून मुंबई सेन्ट्रल स्टेशनवर उतरला. त्या दोघांच स्वागत करण्यासाठी कुणीही हजर नव्हत; असण्याचं कारणही नव्हत. मुंबईच्या पावसाने मात्र स्वागताध्यक्षाची भूमिका बजावत दोघाना चिंब भिजवलं. ते दोघ मुंबईत प्रथमच पाउल टाकत होते. तेव्हां जर कुणी ‘वीस वर्षांनंतर हे दोघ संगीतकार म्हणून नावारूपाला येतील’ अस म्हणल असत, तर त्यावर विश्वास ठेवण कठीण होत.

मुंबई सेन्ट्रलहून ते दोघ पत्ता शोधत कसेबसे एम. एन. टी. स्टुडीओ इथे पोहोचले. कारण? त्या काळातील जाणते संगीतकार पंडित अमरनाथ ह्यांचा मुलगा हरबन्स ह्यांच्याकडे मास्टर सोनिक पार्श्वगायन करणार होते. स्टुडीओत पोहोचेपर्यंत कपडे पूर्ण भिजलेल्या अवस्थेत रेकोर्डिंग करणे मुश्किल म्हणून मास्टर सोनिकनी चटकन बॅगेतील पायजमा चढवला आणि माईकसमोर गायला उभे राहिले. चिंब भिजलेला दहा वर्षाचा ओमी स्टुडीओच्या बाहेर कुडकुडत उभा होता. रेकोर्डिंग संपल्यावर रात्रभर दोघ मुंबईत भटकत राहिले. असेच दोन दिवस काढल्यावर दूरच्या एका परिचिताने त्यांना ठाण्यापासून सात मैल अंतरावर एक झोपडीवजा जागा दिली, जिथे वीज किंवा पाण्याची सोय सुद्धा नव्हती. आसऱ्याचा प्रश्न तात्पुरता सुटला. आतां शोध सुरु झाला कामाचा.

मास्टर सोनिक मुंबईला आले होते गायक बनण्यासाठी. त्यांनी नौशाद, हुस्नलाल भगतराम आणि श्याम सुंदर अशा तेव्हाच्या जाणत्या संगीतकारांकडे पार्श्वगायन केल. “बाझार”, “साजन की गलीया” अशा काही चित्रपटात त्यांनी सोलो गाणी गायली परंतु त्यांचा खडतर काळ संपण्याची चिन्ह दिसेनात. अशात ओमी आजारपणामुळे दिल्लीस परतला. आतां मुंबईत सोनिक एकटेच होते.

पार्श्वगायनापासून सुरु झालेला संघर्ष येउन ठेपला एका नवीन वळणावर, जेव्हां सोनिकना संगीत दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली; वर्ष होत १९५१. कमी बजेट असलेले “ममता”, “मेहफिल” अशा काही चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आपल्या गिरिधर ह्या पुतण्यासह, जो हार्मोनियम वादक होता. पण नियतीने पुन्हां आपला हिसका दाखवला. हे सर्व चित्रपट सपशेल पडले आणि त्याबरोबरच सोनिक ह्यांची बाजारातील किंमतदेखील. सिने-इंडस्ट्रीमध्ये यश हे ‘फ्लॉप’ आणि ‘हिट’च्या वजनात मोजलं जाण्याचे ते दिवस होते. मुळात संगीत दिग्दर्शक झाल्यावर पार्श्वगायनाच्या संधी कमी झाल्या होत्याच, ज्यात भर पडली ‘फ्लॉप’ चित्रपटांचा संगीत दिग्दर्शक ह्या शिक्क्याची.

“त्या काळात जर तुम्ही पार्श्वगायन करत असाल आणि संगीत दिग्दर्शनसुद्धा, तर तुम्हांला जवळपास वाळीत टाकल जाई. आमच्याच बाबतीत असं का झालं ते मला खरच कळत नाही. वास्तविक किशोर कुमार आणि हेमंत कुमार गायक-संगीतकार होते आणि तरी त्यांना मान्यता मिळाली” पुढे एकदा सोनिक म्हणले होते.

१९५४ सालात ओमी दिल्लीहून मुंबईस परत आला, तेव्हां सोनिक ठाणे इथेच झोपडीत रहात होते आणि पुन्हां एकदा दोघ काम शोधण्यासाठी मुंबईतील स्टुडियोच्या चकरा मारू लागले. पण त्यांना संगीत दिग्दर्शन देण्यासाठी कुणीही राजी होत नव्हत. दरम्यान स्त्रियांच्या कोरसमध्ये ओमीला काम मिळाल. “उपासमार टाळण्यासाठी मला काहीतरी काम करण आवश्यक होत”, ओमी एकदां म्हणले होते.

कपडयांची एकच जोडी व मिळेल ते अन्न खाऊन आणखी जवळ-जवळ चार वर्ष त्यांनी खडतर दिवस काढले. “मला आठवत की एक दिवस मला पैशाच पाकीट सापडलं, ज्यात चाळीस रुपये होते. एव्हढे पैसे मी कित्येक वर्षात पाहिले सुद्धा नव्हते ! ते चाळीस रुपये म्हणजे आमच्यासाठी देवाने पाठवलेली भेटच होती. खर तर मी ते पाकीट परत करायला हव होत. पण भुकेने कर्तव्यावर मात केली” ओमी प्रांजळपणे कबूल करतात.

१९५९ साली त्यांना आणखी एक संधी मिळाली. प्रसिध्द संगीतकार मदन मोहन ह्यांनी त्यांच्यातील कलागुण हेरून ‘अरेंजर’ म्हणून आपल्याकडे बोलावून घेतल आणि लवकरच एस. डी. बर्मन, रोशन अशा दिग्गज संगीतकारांकडूनसुद्धां बोलावण आलं. “त्या काळातील आघाडीच्या आणि अतिशय हरहुन्नरी संगीतकारांकडून संगीतातील बारकाव्यांचा अभ्यास करता आला हे आमचं भाग्यच!” सोनिक एकदां म्हणले होते.

सोनिक-ओमींच्या सांगितिक कारकिर्दीतील सर्वाधिक महत्वाचं वर्ष ठरल १९५६. जी. एल. रावल यांनी त्याना रु. १००१ आगाऊ रक्कम आणि गाण्याचे दोन मुखडे दिले आणि म्हणाले, “तुम्ही माझी आगामी फिल्म करत आहात”. हे ऐकून दोघांना आभाळ ठेंगण झाल आणि सर्वोत्तम संगीत देऊन ह्या सुवर्णसंधीचं सोन करायचं, असा चंग त्यांनी बांधला.

dil-ne-phir-yaad-kiya-1966

“आम्ही आठ गाणी रेकॉर्ड केली आणि नंतर सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली. ‘दिल ने फिर याद किया’ हा तो सिनेमा, ज्याने  दोघांची ‘स्वतंत्र’ संगीतकार अशी ओळख निर्माण केली. सिनेमातील जवळ-जवळ सर्व गाणी सुमधुर तर होतीच पण ती लोकांच्या ओठांवरसुद्धां रेंगाळली आणि इतक्या वर्षांनंतर आजही तितकीच ताजी वाटतात.विशेषत: ‘दिल ने फिर याद किया’ हे शीर्षक गीत तर कमालीचं सुरेल होत ज्यांत वाजवलेली फ्ल्यूट तर केवळ स्वर्गीय! आतां तरी आपल्याला यशस्वी संगीतकार अशी ओळख मिळेल अस दोघांना वाटलं पण … तिकिटबारीवर चित्रपट सपशेल पडला आणि त्याबरोबर सोनिक-ओमींचे नांव देखील ‘पडेल चित्रपटाचे संगीतकार’ असे झाले.

mahua_1325738076

“आम्हांला स्टंट किंवा दे-मार चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या, ज्या आम्ही जवळपास नाकारल्या. पण असं किती काळ चालणार? शेवटी आम्ही “आबरू”, “ट्रक ड्रायव्हर”, “बेटी”, “मुजरिम”, “महुआ” अशा काही चित्रपटाना संगीत दिलं, ज्यापैकी ‘दोनो ने किया था प्यार मगर’ हे “महुआ” मधील गाणं तुफान गाजलं. स्व. रफी साहेबांच्या आवाजातील हे गीत आजही लोकांना आवडत. आमचं दुर्दैव म्हणा किंवा विधिलिखित, हे सगळे चित्रपट पडले आणि पुन्हां एकदा पडेल चित्रपटाचे संगीतकार अशी आमची ओळख निर्माण झाली”.

नशीबाचा खेळ बघा! मोहन सैगल यांचा “सावन भादो” सुपर हिट झाला आणि त्यातील गाणी देखील गाजली. इतक्या वर्षांच्या खडतर तपश्चर्येनंतर सोनिक-ओमी ह्या जोडगोळीवर निर्माते विश्वास दाखवू  लागले.

img

“आमच्या संगीतात आमचं खडतर जीवन, आम्ही सहन केलेलं दुख: प्रतिबिंबित झालं, ज्यामुळे आमच्या संगीत रचना हृदयस्पर्शी होऊ शकल्या”. आपल्या सुमधुर गीतांच श्रेय ते आपल्या वेदनांना देतात.

सोनिक-ओमीनी अतोनात हाल-अपेष्टांचा सामना केला, प्रसंगी उपाशीपोटी राहून दिवस काढले, ‘दुय्यम चित्रपटांचे संगीतकार’ असं त्यांना हिणवल गेलं आणि तरीसुद्धां दोघांच्या मनांत त्याबद्दल जराही कडवटपणा नाही किंवा आपल्यावर घोर अन्याय झाला, अशी तक्रारही नाही.

‘कही हो ना मुहल्ले में हल्ला’ (शोभा गुर्टू – ‘चौकी नंबर ११’) ह्या मुजरा गीतातून सोनिक-ओमीनी आपला वेगळेपणा सिध्द केला. ‘दिल ने फिर याद किया’, ‘आजा रे प्यार पुकारे’, ‘कलियोने घुंघट खोले’, ‘लो चेहेरा सुर्ख शराब हुआ’ (मोहम्मद रफी, लता मंगेशकर, मुकेश – दिल ने फिर याद किया), ‘दोनोने किया था प्यार मगर’ (मोहम्मद रफी – महुआ), ‘कान्हा रे कान्हा’ (लता मंगेशकर – ट्रक ड्रायव्हर), ‘आप से प्यार हुआ’ (मोहम्मद रफी) व ‘जिन्हे हम भूलना चाहे’ (मुकेश – आबरू), ‘याद रहेगा’ (मुकेश – लता मंगेशकर – उमर कैद), ‘संसार है एक नदिया’ (मुकेश – आशा भोसले, रफ्तार), ‘राज की बात कह दू तो’ (आशा भोसले – धर्मा) अशा अजरामर गाण्यांनी सोनिक-ओमी कायम स्मरणात रहातील.

(ह्या लेखातील छायाचित्राबद्दल कुणाला आक्षेप असेल, तर ती काढण्यात येतील)

Advertisements

WP10 खडतर यशाचे धनी – सोनिक-ओमी

a-707715-1410635544-2720-jpeg

WP9-Mystique part3

It looked very picturesque, almost like an image straight out of an epic film. The space seemed to have widened too. He looked from left to right and the whole panorama opened to his eyes. Rows of human figures moving about, carrying rolls of cloth on camel back. Green hills in the background, westerly wind creating dust clouds. He also noticed a caravan in the distant horizon. Is this some kind of a fairy tale? He wondered. There was something very peculiar about the whole thing but what was it? He felt amazed as a child. Then it struck him. It was the Silk Road. And he was standing on the threshold of that bygone era. Had he entered another time zone? Or was he hallucinating? His heart began to race faster.
Just then a hand grabbed him by the collar and he was hit hard on the head. For a moment time stopped. He was breathing but his mind was still. Then he collapsed to the ground. His rucksack dropped from his shoulders, the GPS flew in one corner and something spilled from his rucksack, making a jingling sound. That was the last he heard anything. The dust settled down as he lay motionless in the cave of darkness. A hand injected a shot in his arm and within a few seconds he was still as a rag doll.
The office of Chief of Staff, Chinese Military was abuzz with reporters wanting to know what happened in the Mustagata mountain range that fateful morning. All the team mates who were caught in the raging snow storm were safe they were told. One of the members by the name of Brian was in coma but stable. Apparently he had crossed a no man’s land and was attacked by a Caspian Tiger, a species long extinct.
Glossary
Spindrift: It usually refers to spray, particularly to the spray blown from cresting waves during a gale.
Mustagata: Mustagata is a mountain along the fabled Silk Road near the ancient city of Kashgar.
Kashgar: Kashgar is an important hub on the Old Silk Road, a vibrant Islamic centre within Chinese territory.
Snow wands: Poles that are posted along the way by mountaineers marking a route for themselves or others to follow.